ताज्या घडामोडी

थेट जिल्हा परिषद रायवाडीच्या शाळेला न्यायाधीशाची भेट

मुख्याध्यापक रणजीत घुमे आणि विद्यार्थ्यांसोबत न्यायाधीशांची चर्चा

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज चाकूर,लातुर मो-9766553995

रायवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला न्यायाधीशाची भेट… 

चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद रायवाडीच्या शाळेला नुकतीच भेट देऊन शाळेच्या भौतिक सुविधांची जिल्हा सत्र न्यायाधीश सुरेंद्र वडगावकर यांनी पाहणी केली.तालुक्यातील दुर्गम भागातील वाडी,वस्ती,तांड्यांवरील शाळांना न्यायाधीश सुरेंद्र वडगावकर व चाकूर न्यायालयातील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक वामनराव कराड,पंचायत समितीचे ज्येष्ठ विस्ताराधिकारी बालाजी बावचे,केंद्रप्रमुख विद्याधर माने हे भेट देत आहेत.

रायवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची त्यांनी शालेय परिसर स्वच्छतेची,शालेय रंगरंगोटी, शाळेच्या संरक्षण भिंतीवरील रंगरंगोटी,स्वच्छता ग्रह व किचन शेड याची पाहणी करून न्यायाधीशांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक रणजीत घुमे,सुरेश सोळंके,विकास डोंगरे,महमद शेख,प्रफलता सोळंके हे उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.