महाराष्ट्र

चाकूर मुस्लिम संघर्ष समिती मार्फत तहसीलदार यांना निवेदन…

आ.नितेश राणेवर कार्यवाही करा,चाकूर मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीची मागणी

आ.नितेश राणेवर कार्यवाही करा,अशी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीची मागणी..! 

तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांना दिले निवेदन… 

भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती चाकुरतर्फे महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे यांना तहसील मार्फत निवेदन देण्यात आले.तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांनी निवेदन स्विकारले.
एका खासगी वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना नितेश राणे यांनी अल्पसंख्याक व खास करुन मुस्लीम समाजाबाबत वक्तव्य करताना भारतीय संविधान मानणाऱ्या मुस्लीम समाजाच्या संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला.२०१४ मध्ये उच्च न्यायालयाने मुस्लीम आरक्षणास मान्यता दिलेली आहे.परंतु राज्य शासनाने त्यांची अंमलबजावणी न केल्याने आमच्या संघटनेकडून तेव्हापासून आंदोलन केले जात आहे.
आमदार नितेश राणे यांनी सर्व मुस्लिम समाजाच्या संविधानीक अधिकारानुसार रस्त्यावर उतरुन जन आंदोलन केल्यास परत जाऊ देणार नाही.अशा प्रकारच्या धार्मिक वजा इशारा संपूर्ण मुस्लीम समाजाला दिला आहे.यामुळे मुस्लीम समाजात भितीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.एका सत्ताधारी आमदाराने अंल्पसंख्याक समाजास आपल्या संविधानिक अधिकारा पासुन वंचित ठेवण्याचा गंभीर प्रकार केला असल्याने आ.नितेश राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.भविष्यात मुस्लीम आरक्षणा बद्दल बेताल वक्तत्व केल्याने कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अल्पसंख्याक समाजाविरुद्ध वक्तव्ये केल्याप्रकरणी राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे चाकुर तालुका अध्यक्ष सलीमभाई तांबोळी,शहर अध्यक्ष बिलाल पठाण,मुजम्मील सय्यद,इलियास सय्यद,शेख इलियास सर,मतीन गुळवे,शेख ताज,शेख अब्बासभाई,शेख रमजान,मोईन गुळवे,सय्यद,समीर,सय्यद कदीर,बबलू कोतवाल, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.