ताज्या घडामोडी

देवणीच्या बसस्थानक परिसरातील विद्युत तारा झाडांच्या विळख्यात…..

महवितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर....!

लहू आडे /देवणी प्रतिनिधी -9049494456

देवणी महवितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…..! 

देवणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानक परिसरातील काही विद्युत तारा झाडाच्या फांद्याच्या विळख्यात सापडलेल्या दिसून येत आहेत तरी हे कधी ना कधी या बसस्थानक परिसरातील ये जा करणाऱ्या प्रवाशांना किंवा वाटसरु नागरिकांना याची जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या परिसरातील बोरोळ चौकापासून ते बसस्थानकापर्यंत झाडांच्या फांद्या हे अर्ध्या बसस्थानकाच्या प्रांगणात तर अर्ध्या फांद्या हे रस्त्यावर आल्याचे दिसतात तर त्यामध्येच विद्युत तारा हे झाडांच्या फांदीच्या विळख्यात सापडलेले आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने आपली हजेरी लावताच यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होताना ही झाडे पडून विद्युत धारा खंडित होते व कुठलीतरी जीवित हानी घडते याची सर्वस्व जबाबदारी ही महावितरणाच्या कार्यालयावर राहील असे देवणीकरांच्या वतीने चर्चेला उधान येत आहे. बोरोळ चौकापासून ते बसस्थानकापर्यंत रस्त्याच्या बाजूला असलेल्या किराणा दुकाने,मेडिकल,बेकरी,हॉटेल व फळांची हातगाडे हे व्यापारी असल्यामुळे देवणी शहरातील व तालुक्यातून ये जा करणारे हजारो लोक या रस्त्यावरुन चालतात.ही सर्व बाब महावितरणाच्या अधिकारी व कर्मचार्यांना माहीत असून याबाबतचा आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय प्रशासन का घेत नाही अशी चर्चा ऐकावी लागत आहे.

त्यामुळे या भागातील विद्युत तारा झाडांच्या विळख्यातून मोकळ्या करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गातून केली जात आहे.

जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे सर्वांचे डोळे पाणावलेत..!! 

देवणी शहरातील अनेक भागांमध्ये विद्युत तारा हे झाडांच्या विळख्यात सापडलेले आहेत,असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे.व्यापारी व रहदारीच्या ठिकाणीच अशी झाडे असल्याने यामुळे अपघाताला आमंत्रण देण्याच्या अगोदरच अशा निदर्शनास आलेल्या झाडांच्या फांद्या तोडून वेळेतच दुर्घटनेला आळा घालावा असे व्यापारी व नागरिकांतून मागणी होत आहे.

—————————————समस्त व्यापारी देवणी शहर.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.