आपला जिल्हा

शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने चंदर जाधव सरांना सेवापूर्तीचा निरोप.!

केशवराव पाटील विद्यालय बोथी येथे निरोप समारंभ संपन्न..!!

मुख्य संपादक:- सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर मो:-9766553995

चंदर जयसिंग जाधव सरांचा सहपत्नी      सेवापूर्ती सोहळा थाटामाटाने संपन्न..!

शाहू शिक्षण प्रसारक मंडळ शिरुर ताजबंद द्वारा संचलित,केशवराव पाटील विद्यालय बोथी  येथील कार्यरत असलेले सहशिक्षक चंदर जयसिंग जाधव यांनी तब्बल या शाळेचे पहिले मुख्याध्यापक राहून या शाळेला मान्यता आणण्यात सिंहाचा वाटा चंदर जाधव सरांचा आहे.ते आजतागायत जाधव सरांची या शाहू शिक्षण संस्थेमध्ये तब्बल ३० वर्षे एकदम उत्तमरीत्या व आनंदमय मनमिळाऊ पध्दतीने आपली सेवा पुर्ण करण्यात त्यांना परमेश्वराने साथ दिली आहे.

या ३० वर्षामध्ये चंदर जाधव सरांनी आपल्या या संस्थेच्या माध्यमातून फक्त तीन शाळेमध्ये आपली सेवा संपूर्ण केली आहे यामध्ये केशवराव पाटील विद्यालय बोथी ता.चाकूर जि.लातुर,संत सदगुरु विद्यालय उजना ता.अहमदपूर जि.लातुर आणि बाळकृष्ण विद्यालय उजळंब,ता.चाकूर जि.लातुर याठिकाणी आपली सेवा पुर्ण केली आहे.त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्यासाठी चंदर जाधव सरांची पत्नी सौ.कमलबाई व त्यांच्या बहिणी सावित्रीबाई पवार आणि सरांच्या बहिणी सौ.छबूबाई वसंत आडे व भाच्चा लहू आडे व पत्नीच्या वहिनी सौ.सुमनबाई पंडित राठोड व शिवाजी डोंगरे हे नातेवाईक या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाधव सरांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गंगाधरअप्पा अक्कानवरु माजी सरपंच बोथी तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष लातुर तर प्रमुख पाहुणे म्हणून शाहू शिक्षण संस्थेचे सहसचिव उत्तमराव पाटील (डॅडी) मुख्याध्यापक व्यंकटेश विद्यालय जढाळा,ता.चाकूर जि.लातुर बालासाहेब भोसले माजी पोलीस पाटील बोथी व राजकुमार महात्मे माजी सरपंच बोथी,येमले सर मुख्याध्यापक केशवराव पाटील विद्यालय बोथी.संत सदगुरु विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे सर आणि बाळकृष्ण विद्यालय उजळंबचे मुख्याध्यापक होनमोडे सर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी संत सदगुरु विद्यालयाचे सहशिक्षक टेकाळे सर आणि नवनाथ आवाळे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.देशमुख सर संत सदगुरु विद्यालयाचे मुख्याध्यापक व अजय घोरपडे सर बाळकृष्ण विद्यालय उजळंब सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे शाल हार व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केशवराव पाटील विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ लिपीक राजकुमार चेंडके सर,मधुकर कांबळे सर,गजनवी सय्यद सर,टोंकाकूटे सर,फूले सर व सेवक माधव भिंगेवाड,साहेबराव सुरवसे,या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत मिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन नागनाथ आवाळे सरांनी केले तर यावेळी विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.