आपला जिल्हा

चाकूर-अहदपूरचे आ.बाबासाहेब पाटील अपघातग्रस्तासाठी ठरले देवदूतच

नवरात्र महोत्सवात आमदाराकडून अपघातग्रस्त महिलेची सेवा

मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर मो:-9766553995

चाकूर-अहदपूरचे आ.बाबासाहेब पाटील अपघातग्रस्तासाठी ठरले देवदूतच….! 

 

चाकूर-अहमदपूर विधानसभेचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी शिरुर (ताजबंद)पासून उदगीरच्या दिशेने जात असताना अहमदपूर-उदगीर रस्त्यावर असलेल्या वायगाव पाटीजवळ एक महिला अपघात होऊन रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत दिसताच आ.बाबासाहेब पाटील यांनी आपल्या चालकाला गाडी थांबवून आपल्या गाडीत त्या पिडीत महिलेला घेऊन जवळ असलेल्या हाळी (हंडरगुळी) प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले व प्रथमोपचार घेऊन डॉक्टरांनी महिलेचा पाय मोडला आहे म्हणून पुढील उपचारासाठी उदयगिरला घेऊन जाण्याची तयारी सुरु केले.

उदयगिरी हॉस्पिटल उदगीर येथे रुग्णवाहिकेने पाठविण्याचे कामही आमदार पाटील यांनी केले त्या महिलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करुन उपचार करण्यासाठी उदयगिरी हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ.बलशेटवार यांना सांगितले.”देव तारी त्याला कोण मारी”या म्हणीप्रमाणे आज या महिलेसाठी आ.बाबासाहेबजी पाटील हे एक देवदूतच ठरले.या घडलेल्या घटनेला आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी केलेल्या मदतीसाठी सर्वच क्षेत्रातून कौतुकाची चर्चा होत आहे.

नवनारी शक्तिशाली उत्सव म्हणून आपण नवरात्र महोत्सवाकडे बघीतले जाते.याच पवित्र नऊ दिवसाच्या पहिल्या दिवशीच मला एका अपघातग्रस्त महिलेची सेवा करण्यास मिळाले हे माझे भाग्य समजतो.अपघाताची दुर्घटना घडल्यास तात्काळ त्यांना मदत करा,आपल्या मदतीने एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळत असेल तर याच्यापेक्षा मोठे पुण्य कोणते असू शकते.

     आ.बाबासाहेब पाटील चकूर-अहमदपूर विधानसभा

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.