ताज्या घडामोडी

चाकूरच्या एमआयडीसीला लागला मुहूर्त….!

अखेर चाकूरच्या एमआयडीसीला उद्योग मंत्र्यांनी दिला हिरवा कंदील

मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो:-9766553995

चाकूर एमआयडीसी चा प्रश्न लवकरच मार्गी लागणारउद्योगमंत्री उदय सामंत

जिल्हाधिकारी कार्यालय लातुर येथे विशेष बैठक संपन्न….!

आतापर्यंत चाकूर-अहमदपूरचे आजी-माजी आमदारांमध्ये चाकूरची एमआयडीसी मंजूर करुन कोणी आणली यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती,यामध्येच आज थेट महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी चाकूरच्या एमआयडीसीच्या कामाला हिरवा कंदील दाखवून हा महत्वपुर्ण व मोठा निर्णय घेतला व प्रश्न लवकर मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत आज लातूर येथे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा अधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीतून मिळाले आहेत.
अतिरिक्त लातूर औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र.२ व चाकूर औद्योगिक क्षेत्र नांदगाव ता.चाकूर जि. लातूर संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत चर्चा करण्यात आली.
चाकूर एमआयडीसीविषयी भूनिवड समितीने  ०१ सप्टेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असून उच्चाधिकार समितीकडे अहवाल पाठविला आहे.त्यामुळे लवकरात लवकर उच्चधिकार समितीकडून अहवाल प्राप्त होताच प्रत्यक्षात २६६ हेक्टर ५५ आर क्षेत्रात एमआयडीसी चे काम सुरु होणार आहे.चाकूर एमआयडीसी बाबत आ.बाबासाहेबजी पाटील यांनी मागील अनेक दिवसापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरु केला असल्यामुळेच हे काम येत्या एक दोन महिन्यात सुरु होईल असे समजते.त्यामुळे चाकूर तालुक्यात उद्योगधंदे उभारणीस फार मोठी मदत होणार आहे.

या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे,चाकूर-अहमदपूर विधानसभेचे भाग्यविधाते आमदार.बाबासाहेबजी पाटील,आ.विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर व एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.