ताज्या घडामोडी

खुर्दळी येथील जनमाता देवीच्या मंदिरात घटस्थापना

ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषात घटाची स्थापना

मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर मो:-9766553995

जनमाता देवी मंदिरात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व सहपत्नी सौ.दिपाली कदम यांच्या हस्ते घटस्थापना….!

         चाकूर तालूक्यातील खुर्दळी (हाळी खुर्द) येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री.जनमाता आई देवस्थान मंदिरातील घटस्थापनेचा कार्यक्रम आज (दि.१४) अमावास्या रोजी विवेक बंडोपंत शास्त्री यांनी केलेल्या मंत्रोच्चारात संपन्न झाला.पालखी मिरवणूक व जल यात्रा चंद्रकांत साळुंके यांच्या निवास्थानापासून काढण्यात आली. हा कार्यक्रम प्रथा,रुढी परंपरा व रीतिरिवाजानुसार पालखी मिरवणूक,जल यात्रा, आराधी,वाजंत्री यांच्या गजरात चाकूर-अहमदपूर विधानसभेचे भाग्यविधाते आमदार बाबासाहेबजी पाटील,सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम,सौ.दिपाली कदम, चेअरमन डॉ.गोविंदराव माकणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी पर्जन्यवृष्टी व्हावी शेतकऱ्यांच्या सुख – समृद्धीसाठी आराध्यांनी गोंधळीच्या माध्यमातून देवीला साकडे घातले.यावेळी गावकरी,भक्तमंडळी,आराधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याठिकाणी दयानंद सुरवसे,अनिल वाडकर, युवा नेते सागरभैया होळदांडगे,शिवाजी रामपूरकर,पोलीस पाटील साहेबराव पाटील, सरपंच सौ.प्रचिता भोसले,चेअरमन जलील पटेल, माजी सरपंच अशोकराव करडीले,आबा महाराज,ह.भ.प.मोहन महाराज, बालाजी चामले,उद्योजक संगमेश्वर लाटे,यशवंत जाधव, प्रसार माध्यम प्रतिनिधी चेतन होळदांडगे, दिपक पाटील,किशनराव वडारे,सुनिल जाधव, सतीश चंदे,सुमित ढोबळे इत्यादी पत्रकार बांधवांनी आपली या घटस्थापनेच्या कार्यक्रमासाठी प्रार्थनीय उपस्थिती लावली.

सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जनमाता देवी मंदिरात नवरात्रौत्सवात दररोज तर वर्षभर प्रत्येक मंगळवारी अन्नछत्र (महाप्रसाद) भाविक भक्तांमार्फत मंदिर समितीच्या सहकार्याने चालवला जातो.

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन..!!

 

मंदिराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार बाबासाहेब पाटील

मंदीर व गावाच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.येणाऱ्या काळात अल्पसंख्यांक योजनेतून मुस्लीम समाजासाठीही निधी देण्यात येणार आहे असे प्रतिपादन स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत २० लक्ष रुपयांच्या सभागृहाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी केले.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.