इरुबाई पोटे यांचे वृद्धापकाळाने निधन
चाकूर तालूक्यातील घरणी येथील कै.ईरुबाई तुकाराम पोटे यांचे दिंनाक ०१ ऑक्टोबर रविवारी वृध्दापकाळातील आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या मृत्यूसमयी वय ८३ वर्ष होते. त्यांच्यावर अंत्यविधी आज दिनांक ०२ आक्टोबर रोज सोमवार या दिवशी सकाळी १० वाजता सार्वजनीक स्मशानभुमी घरणी येथे करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली, सुन,नातवंडे, असा मोठा परिवार आहे.घरणी येथील माजी सरपंच,भानूदास पोटे यांच्या त्या मातोश्री होत.तसेच डॉ.चिंते डी.एन यांच्या जेष्ठ भगिनी होत्या.