आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर क्रिकेट चषकाचा आज भव्य बक्षीस वितरण सोहळा…

सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु (आर्ची) व कसोटी क्रिकेटपटू प्रसाद कानडे यांच्या प्रमुख उपस्थित होणार बक्षीस वितरण

संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज चाकूर,लातूर मो-9766553995

सैराट फेम रिंकू राजगुरु (आर्ची) व प्रसाद कानडे यांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण सोहळा…. 

शिवजयंतीच्या निमित्ताने शौर्य क्रिकेट क्लबच्या वतीने लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा रात्रीच्या वेळेस घेण्यात आली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संत गोविंद बाबा मैदान लातूर रोड येथे सायंकाळी वाजता होणार आहे.

सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु (आर्ची) व क्रिकेट कसोटीपटू प्रसाद कानडे युवा उद्योजक इंजीनियर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

तरी चाकूर व अहमदपूर तालुक्यातील सर्व क्रिकेट प्रेमींनी या बक्षीस वितरण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर,भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे,रणजित भोसले,बाळासाहेब कांबळे,विवेकानंद ढोबळे,युवराज आगरकर,रमेश सोनटक्के यांनी केले आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.