देश विदेश

झरीचा हिरा संसदेच्या कारनाम्याने देशात चमकला….!

अमोल शिंदे नावाच्या मुलाने देशाची झोप उडवली

झरी गावाचे नाव अमोल शिंदेच्या कारनाम्याने  देशाच्या नकाशावर चमकले….! 

सुनिल जाधव/9766553995

लातुर जिल्ह्याची ओळख म्हणजे इ.स १९९३ साली प्रलयकारी भुकंप किल्लारी येथे झाला होता,त्यानंतर लातुर शहराला उजनी धरणावरुन थेट रेल्वेने पिण्याचे पाणी इ.स २०१६ साली आणल्याने त्यावेळीचा क्षण म्हणजे लातूरची ओळख आणि आता संसदहल्याच्या स्मृतिदिनीच चालू असलेल्या सत्रात संसदेत उडी मारल्याच्या कारनाम्याने अमोल शिंदे या युवकाने देशामध्ये लातूर जिल्ह्यातील आपल्या छोट्याशा चाकूर तालुक्यातील झरी (नवकूंड) या गावाची देशभरात ओळख निर्माण करुन दिली आहे.

अमोल शिंदे या युवकाने आतापर्यंत सैन्यात व पोलीस भरतीत यश संपादन नाही केल्याने हे कृत्य घडले आहे असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.अमोल शिंदे या तरुणाच्या कुटूंबाची स्थानिक पोलीस पथकाकडून कसून चौकशी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.अमोल या तरुणाचा जन्म अगदी गरीब कुटुंबात झालेला आहे.आई वडील मोलमजुरी करुन आपल्या संसारातील दोन मुलांची व आपल्या पोटाचे उदरनिर्वाह भागवतात दोन्ही भाऊही हाताला लागेल ते काम करुन आई वडिलांना मदत करतात.

अमोलने ९ डिसेंबर रोजी भारतीय सैन्यात दाखल झालो म्हणून असे सांगून दिल्ली गाठला परंतु भर संसदेत उडी मारला याचे कारण अजूनही तो भरतीत अपयश येत असल्याने केले असावे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.