तिर्थवाडी येथील श्री.किर्तेश्वर गणेश मंडळाच्या वतीने शेतीविषयक मार्गदर्शनाचे आयोजन..!
शेतकऱ्यांना शेतीविषयी शामभाऊ सोनटक्के यांनी केले मार्गदर्शन.

तीर्थवाडी येथे कृषिभूषण शामभाऊ सोनटक्के यांचे सेंद्रीय शेतीविषयी मार्गदर्शन..!
मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज मो.9766553995
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी येथे श्री.गणेश सार्वजनिक किर्तेश्वर गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाचा एक भाग म्हणून २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी गणेश आरतीनंतर रात्री आठ वाजता “सेंद्रीय शेती (विषमुक्त शेती)” या विषयावर विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषिभूषण शामभाऊ सोनटक्के लोहारा,यांचा मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करताना सेंद्रिय शेतीचे महत्त्व,टिकाऊ शेतीचे फायदे आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब याविषयी सखोल माहिती दिली.
श्यामभाऊ सोनटक्के यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे सांगितले.
1)सेंद्रिय शेतीमुळे मातीची सुपीकता व जलधारण क्षमता वाढते.
2)रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे मानवाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
3)गाईच्या शेण, गोमुत्र, कंपोस्ट व जीवामृताच्या वापरातून अत्यंत कमी खर्चात उत्तम शेती करता येते.
4)गोपालनामुळे मिळणाऱ्या उपपदार्थांचा योग्य वापर करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतो.
विषमुक्त शेतीमधून उत्पादन होणाऱ्या धान्य,भाज्या व फळांना बाजारात अधिक मागणी असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.
प्रत्यक्ष उदाहरणे व प्रेरणादायी माहिती श्यामभाऊ सोनटक्के आपल्या वैयक्तिक अनुभवातून प्रत्यक्ष शेतात केलेल्या प्रयोगांची उदाहरणे दिली.गोमूत्रापासून तयार होणाऱ्या कीटकनाशकांचा उपयोग,घरगुती पातळीवर कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धती,पिकांना नैसर्गिक पद्धतीने रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे मार्ग याचे प्रत्यक्ष दाखले त्यांनी शेतकऱ्यांसमोर मांडले.
त्यांनी स्पष्ट केले की,“आज रासायनिक शेतीत उत्पादन जरी जास्त मिळत असले तरी खर्चही तितकाच वाढतो आहे.त्याउलट सेंद्रिय शेतीत खर्च कमी,उत्पादन टिकाऊ आणि बाजारभाव अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणता येते.”
ग्रामस्थांचा मोठा सहभाग-या मार्गदर्शन कार्यक्रमाला तीर्थवाडीसह आसपासच्या गावांतील शेतकरी,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रश्नोत्तर सत्रात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शंका विचारल्या. श्यामभाऊ सोनटक्के संयमपूर्वक उत्तर देत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात ग्रामस्थांनी आयोजक मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.“गणेशोत्सवात धार्मिकतेसोबत सामाजिक व शैक्षणिक जाणीव जागविण्याचे काम होत आहे, ही आनंदाची बाब आहे,”असे उपस्थितांनी नमूद केले.
समाधानकारक पार पडलेला उपक्रम व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.शेवटी आयोजक मंडळातर्फे उपस्थितांचे आभार मानण्यात आले.हा कार्यक्रम शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.