गणेशोत्सव हे शिस्तीत व शांततेत साजरे करा-पोलीस निरीक्षक बालाजी भंडे
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत मद्यपान आणि डी.जे लावण्यास बंदी.

गणेशोत्सव हे शिस्तीत व शांततेत साजरे करा.-पोलीस निरीक्षक बालाजी भंडे
विसर्जनाच्या दिवशी मद्यपान आणि डीजे साठी बंदी.
मुख्य संपादक-सुनिल जाधव मो.9766553995
चाकुरः-आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकुर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
आगामी गणेशोत्सव शांततेत,शिस्तीत आणि सामाजिक जबाबदारीने साजरा करण्यासाठी सर्वच गणेश मंडळाने संकल्प असे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी केले. थ्री-डी म्हणजे डीजे मुक्त,धिंगाणा मुक्त आणि मद्यपान मुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी चाकुर ठाण्यात दि.२१ रोजी गुरुवारी संध्याकाळी ४ः३० वाजता आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केले.बैठकीत पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी पर्यावरण पूरक परवानगी घेऊन आगामी सण उत्सव समाजोपयोगी स्पर्धा घेऊन सन उत्सवाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत साजरा करा असे प्रस्तावनेत सांगितले.
यावेळी बालाजी भंडे यांनी पुढे बोलताना गणेश मंडळ आणि प्रशासन दोन्हींच्या विन-विन भूमिकेवर भर देत सांगितले की,वेळेत,शांततेत आणि नियमांचे पालन करत विसर्जन केल्यास सण खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.बैठकीत सांगितले की, गणेशोत्सव हा भक्ती,संस्कृती आणि सामाजिक एकतेचा सण आहे.उंच मूर्ती, अयोग्य ध्वनीप्रदूषण,जास्तीचा वेळ किंवा गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.सीसीटीव्ही बसवण्याचे प्रयत्न करावे स्टेज बांबूचा बनवावा,वाहतुकीला मिरवणुकीत अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी ग्रामीण भागातील पोलीस पाटलांनी आमचे प्रतिनिधी म्हणून काम करावे गणेश मंडळांनी स्वयंसेवक तत्पर ठेवावे चाकुर पोलीस स्टेशन अंतर्गत १०१ गावे असून एक गाव एक गणपती यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणेश मंडळानी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प जाहीर केला.
यावेळी बैठकीस पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे,पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण,गोपनीय शाखेचे पो.हे.चंद्रशेखर डिगोळे,माजी उपसरपंच सय्यद मुर्तुजाअली, शहराध्यक्ष पप्पुभाई शेख,सलीमभाई तांबोळी सोशल मिडिया प्रमुख कॉंग्रेस पार्टी चाकुर,बाळु कांबळे,गुलाब पठाण,महमद सय्यद,अझहर शेख,युसुफ शेख,तालुक्यातील पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.
सीसीटीव्ही कॕमेरे लावणाऱ्या गणेश मंडळाचा होणार सन्मान,चाकुर शहरासह तालुक्यातील गणेश मंडळानी गणेशत्सव काळात सीसीटीव्ही कॕमेरे लावावे १ ते ४ सीसीटीव्ही कॕमेरे लावणाऱ्या गणेश मंडळाचा सत्कार पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात येईल.४ ते ८ कॕमेरे बसवणाऱ्यां गणेश मंडळाचा सत्कार उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी हस्ते होईल.८ ते १६ सीसीटीव्ही कॕमेरे लावणाऱ्या गणेश मंडळाचा प्रशस्ञीपञ सन्मान अप्पर पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते होईल.गणेश मंडळानी सीसीटीव्ही कॕमेरे लावण्याचे आव्हान पोलीस प्रशासनाने केले आहे.