आपला जिल्हा

चाकुर शहरात शहीद हजरत टिपू सुलतान (रहें) यांचा जन्मोत्सव साजरा

ध्वजारोहन,रक्तदान आणि शिबिर व भव्य अशा मिरवणूकीचे आयोजन

चाकुर शहरात शहीद हजरत टिपू सुलतान (रहें) यांचा जन्मोत्सव साजरा

ध्वजारोहन,रक्तदान आणि शिबिर व भव्य अशा मिरवणूकीचे आयोजन

हजरत शहीद टिपु सुलतान (रहें) यांची २२४ वा जन्मोत्सव चाकुर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दिवसभर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने हजरत टिपू सुलतान [रहें] यांच्या जन्मोत्सव निमित्त ३० नोव्हेंबर २०२३ सोमवारी सकाळी ११ वाजता टिपू सुलतान चौकात ध्वजारोहन करण्यात आले.

चाकुर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीरांचे उदघाटन महाराष्ट्र राज्यांचे माजी मंञी बाळासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती तथा गटनेते करीम गुळवे होते.प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर,सय्यद मुर्तुजाअली,नितीन रेड्डी,सुरेश हाके पाटील, सय्यद इलियास,पपन कांबळे,रामभाऊ कसबे,डॉ.एन.जी.मिर्झा,संदीप शेटे,संतोष फुलारी,आदी होते.शहरातील युवकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपला हातभार लावला. यावेळी विक्रमी 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबीरात शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.टीपू सुलतान चौकातुन मिरवणूकीला सुरूवात केली.रहेमत नगर,नांदेड-लातुर हायवे मार्गे,नवीन बसस्थानक,बोथी चौक,जुने बसस्थानक,नगरपंचायत मुख्य कमान,सोसायटी चौकात जन्मोत्सव निमित्त गुरुवारी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि लोह-आधारित मैसूरियन रॉकेटचा विस्तार केला,जे जगातील पहिले रॉकेट असल्याचे म्हटले जाते. त्याच्या वडिलांचे फ्रेंचशी राजनैतिक संबंध होते, ज्यामुळे टिपू यशस्वी करण्यासाठी शेख पप्पुभाई,सलीमभाई तांबोळी,शेख इलियास,सय्यद निहाल,मतीन गुळवे,शेख अझहर,तोसिफ शेख,शकील कमाल,बाबा सय्यद,शकील गुळवे,अझहर सौदागर,समद शेख,अतहर शेख,सय्यद मुदस्सीर,आसिफ रेलवाले,आदिने परिश्रम घेतले.

मेरा टीपु शेरे ए म्हैसुर गाण्यावर युवक थिरावले

वाजत-गाजत भव्य मिरवणूक

संध्याकाळी पाच वाजता टीपू सुलतान चौकातुन नाम अशा जयघोषांनी परिसर दणाणुन सोडले.मुख्य रस्त्यावर वरून मिरवणूक निघाली असता.शाहु महाराज चौकात प्रतिमेचे पुजन करून नगराध्यक्ष कपील माकने यांनी अभिवादन केले.यावेळी सय्यद इलियास, नितीन डांगे,उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकांत शेरे ए हिंद हजरत शहीद टीपू सुलतान यांच्या प्रतिमेचे मिलिंद महालिंगे यांनी केले. यावेळी मधुकर कांबळे,प्रभाकर गायकवाड,नागसेन महालिंगे,उपस्थित होते.मज्जिद चौकात मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.

           रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चाकुर शहरातील 72 रक्तदात्यांनी रक्त करुन राष्ट्रीय कार्यात आपला हातभार लावला.सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.युवकांनी रक्तदान केल्याबदल टीपु सुलतान सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.