आपला जिल्हा

भाजपाच्या लातुर जिल्हा उपाध्यक्षपदी राजकुमार राजारुपे यांची निवड

जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड

संपादक-सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर मो-9766553995

भाजपाच्या लातुर जिल्हा उपाध्यक्षपदी राजकुमार राजारुपे यांची नियुक्ती… 

चाकूर पंचायत समीतीचे माजी सदस्य राजकुमार राजारुपे यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी लातुर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांनी निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले,व भारतीय जनता पार्टीचे संघटन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष तुकाराम मद्दे,माजी सभापती व्यंकटराव सोनवणे युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सचिन शेटे, ज्ञानेश्वर सांगवे इत्यादी यावेळी उपस्थित होते.राजकुमार राजारुपे हे माजी प.स.सदस्य होते तर त्यांच्या पत्नी भाग्यश्री राजारुपे कबनसांगवीच्या सरपंच होत्या.त्यांच्या कार्यकाळात गावात व मतदार संघात अनेक विकास कामे केलेली असून त्यांनी त्यांच्या सोबत युवक वर्गाचे मोठे संघटन उभे केलेले आहे.भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा उपाध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके,तालुकाध्यक्ष वसंतराव डिगोळे,जिल्हा सरचिटणीस नितीनजी रेड्डी, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार,भाजपा.ओ.बी.सी मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकांत सुर्यवंशी,विलास कोतापुरे,महादेव कानगुले इत्यादींनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.