आपला जिल्हा

राचन्नावाडी येथे ऊस परिसंवाद चर्चासत्र कार्यक्रम संपन्न..

संपादक-सुनिल जाधव सेवा लाईव्ह वेब & न्यूज लातुर मो-9766553995

राचन्नावाडी येथे ऊस परिसंवाद चर्चासत्र संपन्न..! 

चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथे बुधवार २७ डिसेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ चाकूरयु,पी, एल लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस परिसंवाद चर्चासत्र आयोजित करण्यात आले.यावेळी चाकूर विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन डॉ. गोविंदराव माकणे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी प्रमुख आयोजक,रोटरी क्लब चाकूरचे अध्यक्ष.रो .चंद्रशेखर मुळे,सचिव विश्वनाथ एडके,प्रमुख पाहुणे राचन्नावाडीचे सरपंच संपत मलिशे या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक यूपीएल लिमिटेड चे अमोल आंधळे उपस्थित होते.यावेळी उसाचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी साहेबराव डिगोळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपस्थित शेतकऱ्यांना अमोल आंधळे यांनी ऊस पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन,खत व्यवस्थापन,ऊस बेणे लागवडीची पद्धत,पाणी व विजेची बचत कशी करावी,एकरी शंभर टन उत्पादन तंत्रज्ञान,कमी पाण्यावर उसाचे अधिक उत्पादन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी चाकूर,बोथी,कलकोटी,टाकळगाव, शेळगाव,राचन्नावाडी येथील शेतकऱ्यांनी या ऊस परिसंवाद चर्चासत्राचा लाभ घेतला कार्यक्रमानंतर रोटरी क्लबचे सचिव विश्वनाथ एडके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.