ताज्या घडामोडी

नवसाला पावणाऱ्या जनमाता देवी मंदिरात उद्या घटस्थापना

खुर्दळी येथील मंदिरात मान्यवरांच्या हस्ते होणार घटस्थापना

मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा न्यूज लातुर  मो:-9766553995

नवसाला पावणाऱ्या जनमाता देवी मंदिरात उद्या घटस्थापना होणार….! 

खुर्दळी (हाळी खुर्द, ता.चाकूर) येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री.जनमाता आई देवस्थान मंदिरातील घटस्थापनेचा कार्यक्रम शनिवारी (दि.१४) अमावास्या रोजी संपन्न होणार आहे.हा कार्यक्रम प्रथा,परंपरा व रीतिरिवाजानुसार पालखी मिरवणूक,जल यात्रा,आराधी,वाजंत्री यांच्या गजरात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

नवरात्री महोत्सवात पायी येणाऱ्या भाविक भक्तांची मोठी गर्दी असते.त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.याबरोबरच पोलीस,पंचायत समिती, तहसील प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी सुविधा पुविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.यासोबत मतदार जनजागृती अभियान, आरोग्य व स्वच्छ्ता विषयक जनजागृती,सायबर गुन्हेगारी प्रतिबंध आदिविषयांवर नवरात्री काळात प्रशासनाच्या मदतीने जनजागरण करण्यात येणार आहे.नवरात्रोत्सव दि.१४ शनिवार (घटस्थापना) ते दि.२४ (विजयादशमी, दसरा) या कालावधीत संपन्न होत आहे.

               देवीची आख्यायिका 

सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेली जनमाता देवी स्वयंभू असून,देवीचे मुळ ठाणे बोधन (जि.निजामाबाद,आंध्रप्रदेश) येथील असल्याची आख्यायिका पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूस स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र तिर्थ (कल्लोळ) आहेत,तर पश्चिमेस अखंड वाहणारी छोटी नदी आहे. देवीची आख्यायिका भक्त पुढीलप्रमाणे सांगतात.

पुर्वीच्या काळी दळण-वळणांची साधणे नसल्यामुळे व्यापारी माल वाहतुकीसाठी उंट,घोडे,गाढव,बैल,रेडा आदी पाळीव प्राण्यांचा वापर करत होते.”आंध्रप्रदेशातील माल सोलापूरकडे घेऊन जाताना खुर्दळी येथे नदी किनारी,वृक्षांच्या छायेत व्यापारी मुक्काम करीत असत.असेच एके दिवशी काही व्यापारी उंटावरुन तांदळाच्या गोण्या (पोते) घेऊन जाताना खुर्दळी येथे मुक्कामी थांबले.दुसऱ्या दिवशी पुढे जाण्यास निघाले असता,उंटाच्या पाठीवर गोण्या ठेवत असताना त्यातील एक गोणी उचलत नव्हती.

              त्यामुळे व्यापाऱ्यांनी गोणी सोडून तांदूळ बाहेर काढला असता त्यामध्ये सुपारीच्या आकाराएवढी देवीची मुर्ती निघाली. देवीची येथेच राहण्याची ईच्छा असल्याचे समजून व्यापाऱ्यांनी या ठिकाणी देवीच्या (तांदळाई) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली. ‘सुपारी’च्या आकाराची मुर्ती कालांतराने पुढे स्वयंभू वाढत जाऊन मोठी झाल्याचे भाविक भक्त सांगतात.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.