ताज्या घडामोडी

एकल महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वलांडी व होनाळी येथील अल्पवयीन मुलीच्या न्यायासाठी एकल महिला संघटना आक्रमक भूमिकेत

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज नेटवर्क📡 लातुर मो-9766553995

वलांडी आणि होनाळी येथील बलात्कार प्रकरणी एकल महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन…. 

देवणी तालुक्यातील वलांडी आणि होनाळी येथील अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी एकल महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची चौकशी करुन आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून एकल महिला संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

वलांडी येथील सहा वर्षाच्या लहान मागासवर्गीय मुलीवर सतत पाच दिवस लैंगिक अत्याचार केलेल्या अल्ताफ कुरेशी या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी व होनाळी येथील सामुहिक बलात्कार या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहेत म्हणून एकल महिला संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले.

तरी या दोन्ही आरोपींना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावे,आणि घडलेल्या घटनेचे समाजात पडसाद उमटले आहेत तरी या आरोपींना योग्य ती शिक्षा दिल्यास अशा घटना समाजात पुन्हा तरी घडणार नाहीत.समाजात अशा घटनेला आळा बसेल म्हणून या निवेदनात उल्लेख करण्यात आले आहे.

यावेळी एकल महिला संघटनेच्या चाकूर तालुका सचिव आम्रपाली तिगोटे,उदगीर तालुका अध्यक्ष द्रोपदा गवळे,रेणापूर तालुका सचिव भाग्यश्री रणदिवे, चाकूर सुरेखा मसुरे,चाकूर हजरतबी शेख,लातूरच्या चंद्रलेखा गुंडरे,सुमित्रा आलूरे इत्यादी संघटनेच्या महिला पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.