आपला जिल्हा

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रमेश फूले या युवकाने केली आत्महत्या

संपादक-सुनिल जाधव सेवा लाईव्ह वेब & न्यूज लातुर मो-9766553995

धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने    आष्टा येथील तरुणाची चिट्टी लिहून रेल्वेखाली आत्महत्या….! 

चाकूर तालुक्यातील आष्टा येथील रमेश चंद्रकांत फुले वय ३३ वर्षे या तरुणाने अनेक वेळा धनगर आरक्षण लढ्यामध्ये सहभागी होऊन धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध आंदोलनात सहभागी झाला होता.वेगवेगळ्या पक्षाचे सरकार स्थापन झाले धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणाची अमलबजावणी करण्यासाठी आश्वासन दिले मात्र आजपर्यंत कोणत्याही पक्षाने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही.या नैराश्यातून आष्टा येथील रमेश चंद्रकांत फुले यांनी चिट्टी लिहून ता.२४ डिसेंबरच्या मध्यरात्री आष्टा येथील रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या केली आहे.या घटनेची माहिती मिळताच नळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भागवत मामडगे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

रमेश फुले यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले असून वडील उपार्जीत शेती नसल्याने आई वडील,रमेश व त्याची पत्नी मोल मजूरी करून आपली उपजिवीका भागवत होते.रमेश यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच विविध समाज बांधव घटनास्थळी दाखल झाले.नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा रमेश फुलेंच्या कुटुंबियांनी घेतला.

त्यानंतर धनगर समाज विकास परिषद या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गोयकर,अशोक करडिले,रमेश पाटील,सुधाकर हेमनर,सतिश गाडेकर,नारायण काचे,अमोल घायाळ,बालाजी इरळे,राम वाघमोडे,ओम देवकत्ते आदी समाज बांधवांनी तहसिलदार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.रमेश फुले यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० लाखाची आर्थिक मदत मिळावी,कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरीत घ्यावे,नोकरीत एक महिन्याच्या आत समावून घेण्याचे लेखी हमीपत्र द्यावे,फुले यांच्या कुटुंबीयांस घरकुल तसेच शासकीय योजनेचा लाभ घ्यावा,सरकारने याची गंभीर दखल घेऊन धनगर समाजाला ए.सटी.आरक्षणाची अंंमलबजावणी करावी आदी मागण्याचे निवेदन चाकूरचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्य मागास वर्गीय आयोग,गृहमंत्री,आमदार गोपीचंद पडळकर,जिल्हाधिकारी यांना माहितीत्सव लेखी निवेदन देण्यात आले आहे.लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र सर्व समाज बांधवांनी घेतला त्यानंतर तहसिलदार यांनी वरिल सर्व मागण्या शासन दरबारी तात्काळ पाठवण्यात येत आहेत व सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येत असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर रमेश फुले यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.रमेश फुले यांच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ,दोन मुली,एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

रमेश चंद्रकांत फुले रा.आष्टा येथील युवकास सेवा लाईव्ह वेब & न्यूज लातुर च्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली…💐💐

 

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.