आपला जिल्हामहाराष्ट्र

अंगणवाडीची मुले हीच देवाघरची फूले शिक्षणापासून वंचित..!

संपादक-सुनिल जाधव सेवा लाईव्ह वेब & न्यूज लातुर मो-9766553995

लहू आडे /देवणी तालुका प्रतिनिधी-9049494456

देवणी तालुक्यातील अंगणवाडीची मुले १४ दिवसापासून शिक्षणाच्या प्रवाहातून वंचित….! 

राज्यव्यापी अंगणवाडी कर्मचारी संपाचा चिमुकल्यावर परिणाम..!! 

लहान मुले हीच देवाघरची फुले या म्हणीप्रमाणे ही लहान बालके शिक्षणापासून वंचित झाल्याचे चित्र देवणी तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडीला टाळे लावल्याचे निदर्शनास येत आहेत याचे कारण म्हणजे जवळपास १४ दिवसांपासून अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या विविध मागणीसाठी राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरु आहे.यामुळे तालुक्यातील लहान चिमुकल्यांना गेल्या १४ दिवसांपासून पोषक आहार मिळत नाही व या लहान बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अंगणवाडीतील लाभार्थ्यांना वर्षातून ३०० दिवस पोषक आहार मिळणे बंधनकारक आहे,त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सध्याच्या संपामुळे किंवा इतर अपातकालीन परिस्थितीत देखील पण अंगणवाडीतील लाभार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये,यासाठी आहाराचे वाटप इतर दुसऱ्या यंत्रणेमार्फत देण्याचे सूचना देण्यात आले आहेत.परंतु काही प्रकल्पातील अंगणवाडीतील आहार बंद असल्याने लाभार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत.त्यामुळे भविष्यात बालकात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता दाट आहे,असे सर्वसामान्य नागरिकांतून चर्चा ऐकावे लागत आहे. तालुक्यातील अंगणवाडी मधील लहान बालकांची संख्या हजारोंच्या संख्येने असून येथील ३ ते ६ वर्षे वयोगटातील याही चिमुकल्यांना दैनंदिन पोषक आहार शिजवून दिले जाते व त्यांना पुर्व प्राथमिक धडे शिकवले जाते,त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते याच अंगणवाडीमध्ये वेळोवेळी लहान मुलांना लसीकरण दिले जाते.

या सर्व संदर्भातून अंगणवाडीच्या माध्यमातून सुरु असून शासनमात्र अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागणीकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या मागणीकडे विशेष लक्ष देऊन वाढीव मानधन द्यावे.सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटी बाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासोबत इतर मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनात सहभाग घेत देवणी तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस ४ डिसेंबर पासून बेमुदत संप सुरु केला आहे.

आज १४ दिवसापासून अंगणवाडीतील या “लहान बालकांना हातामध्ये रिकामे डबे घेऊन चकरा मारावे लागत आहेत”,तर तालुक्यातील पालक वर्गातून अंगणवाडी कायमच्याच बंद झाल्या की काय असेही प्रश्न उद्भवत आहेत.देवणी तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी विविध मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.यामुळे तालुक्यातील गेल्या १४ दिवसांपासून पूरक पोषण व पूर्व शिक्षणापासून लहान मुले वंचित असल्याचे दिसून येत आहे.

शासनाने तात्काळ निर्णय घेऊन कार्यकर्ती व मदतनीस यांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करुन अंगणवाड्या पूर्ववत चालू करावे आणि लहान बालकांचे अंगणवाडीकडे होणारे फेरफटके कमी होऊन बालक हे पोषण आहार खाऊन मौजमजेने आनंदाने बागडत खेळत पुर्व प्राथमिक शिक्षण घेतील असे तालुक्यातील माता पित्यांचे म्हणणे आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.