महाराष्ट्रराजकीय

चाकूर-अहमदपूर मतदारसंघासाठी ६८ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नामुळे भरघोस निधीला मंजुरी

मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा लाईव्ह वेब & न्यूज लातुर मो-९७६६५५३९९५

चाकूरकरासाठी ३४ कोटी ४६ लाख तर अहमदपूरसाठी ३४ कोटी २४ लाख रुपयाचा निधी मंजूर….!

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांना यश..!!

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असताना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी २०२३-२४ ची पुरवणी सादर करण्यात आली.यामध्ये चाकुर-अहमदपूर विधानसभेच्या विकास कामासाठी चाकूर अहमदपूर  विधानसभेचे कार्यसम्राट आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी मागणी केली होती.चाकूर व अहमदपूर या दोन्ही तालुक्यासाठी ६८ कोटी ७० लाख रुपयाचा भरघोस निधी मंजूर करुन घेतला आहे.

चाकूर अहमदपूर विधानसभेसाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकारचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनापासून आभार मानले आहेत.यापुढे येत्या काळातही चाकूर-अहमदपूर विधानसभेच्या विकास कामासाठी भरघोस निधीची मागणी केलेली आहे तरी त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विकास कामासाठी निधी मंजूर करून देऊ असे आश्वासनही दिले आहेत.तरी माझ्या चाकूर-अहमदपूर विधानसभेत जास्तीत जास्त विकास कामे करण्याचे माझे ध्येय असेल असे चाकूर अहमदपूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

चाकूर-अहमदपूर विधानसभेसाठी जास्तीत जास्त निधी कशा पद्धतीने खेचून आणता येईल याचा मी तत्पर प्रयत्नशील राहील असे आमदार यांनी सांगितले आहे.

 

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.