ताज्या घडामोडी

चाकूरची संत सेवालाल महाराजांची सार्वजनिक जयंती २५ फेब्रुवारीला…

समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी जाधव तर उपाध्यक्षपदी प्रा.डॉ.बी.डी पवार यांची निवड

संत सेवालाल महाराज चाकूरची सार्वजनिक जयंती २५ फेब्रुवारीला होणार…!

सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचा बैठकीत निर्णय..

चाकूर तालुक्यातील सर्वच तांड्यातील बंजारा समाजातील समाज बांधवांना आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी शासकीय विश्रामगृह चाकूर येथे संत सेवालाल महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव २०२४ चाकूर येथील जयंती साजरी करण्यासाठी बंजारा क्रांती दल लातुर जिल्हाउपाध्यक्ष व व्ही जे एन टी सेलचे तालुकाध्यक्ष नागेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत संत सेवालाल महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव २०२४ चाकूर नवीन समितीची स्थापना करण्यात आली,यामध्ये या जयंतीचे नुतनाध्यक्ष शिवाजी जाधव हणमंतवाडी तांडा तर उपाध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.बी.डी.पवार चाकूर,सचिव दिपक राठोड सेवापूर तांडा वडवळ,कार्याध्यक्ष राजकुमार जाधव माजी उपसरपंच नागदरवाडी,हटकरवाडी मिरवणूक प्रमुख विकास चव्हाण,सुनिल जाधव,समाधान जाधव,संतोष जाधव व मार्गदर्शक धर्मपाल पवार उपसरपंच बोथी,वामन जाधव, संजय चव्हाण,खजीनदार शंकर जाधव व नारायण चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी अनिल राठोड,नवनाथ राठोड,किरण राठोड,नितीन राठोड,सुनिल राठोड,लक्ष्मण जाधव,बालाजी जाधव,सुभाष राठोड,लखन जाधव,तानाजी जाधव,किरण जाधव,अमोल राठोड,बालाजी राठोड ,जयपाल जाधव इत्यादी तरुण नवयुवक या बैठकीला उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.