आपला जिल्हा

मराठा समाजातील खुल्या व कुणबी प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी प्रशासन उद्यापासून राजेंच्या दारी नतमस्तक

चाकूर तालुक्यात उद्यापासून सर्वेक्षणाला सुरुवात,प्रशासकीय अधिकार्यांना सहकार्य करावे-तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांचे जनतेस आवाहन

मुख्य संपादक सुनिल जाधव सेवा न्यूज चाकूर,लातूर मो-९७६६५५३९९५

मराठा समाजातील खुला व कुणबी प्रवर्गातील सर्वेक्षणाला अखेर प्रशासनाचा हिरवा कंदील….. 

मराठा समाजातील खुल्या व कुणबी प्रवर्गातील  योग्य आणि खरे ते सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अखेर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हिरवा कंदील देऊन उद्यापासून सर्वेक्षण या कामाची सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत,काल त्या अनुशंगाने चाकूर येथील यशवंत मंगल कार्यालय येथे प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.

जिल्हा पातळीवर प्रशिक्षण घेतलेल्या मास्टर प्रशिक्षक अविनाश पवार व प्रशांत तेरकर यांनी हे प्रशिक्षण दिले.प्रगणक आणि पर्यवेक्षक यांनी हे सर्वेक्षणाचे काम वेळेत व यशस्वीपणे पूर्ण करावेत अशा सुचना दिल्या व दिलेल्या आदेशाचे पालन करुन चाकूर तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवर असलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत आपापल्या गावांमध्ये जाऊन योग्य व खरी माहिती खुला प्रवर्ग आणि कुणबी प्रवर्गातील सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी यावेळी दिले.

उद्या दिनांक २३ जानेवारी २०२४ पासून ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंतच्या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करुन अहवाल सादर करण्यात येणार आहे तरी आपल्या गावात व घरी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन चाकूर तालुक्याचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी चाकूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय नरळे,नायब तहसीलदार दिगंबर स्वामी,प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार अभय म्हेत्रे,प्रगणक व पर्यवेक्षक उपस्थित होते.

तालुक्यातील संपूर्ण सर्वेक्षणासाठी ४४४ प्रगणक आणि ३० पर्यवेक्षक व ०६ नोडल अधिकारी असून राखीव १८ प्रगणक०५ पर्यवेक्षक असे एकूण ५०३अधिकारीकर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.