ताज्या घडामोडी

चाकूरची संत सेवालाल महाराजांची सार्वजनिक जयंती उत्साहात साजरी

आपली संस्कृती जपण्यासाठी पारंपारिक वेशभूषेत तालुक्यातील बंजारा समाज एकवटला.

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज चाकूर, लातुर मो-9766553995

चाकूरची संत सेवालाल महाराजांची सार्वजनिक जयंती जल्लोषात साजरी..

बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती संपूर्ण चाकूर तालुक्यातील बंजारा समाजातील महिला भगिनी तरुण युवक व नागरीक आपल्या बंजारा समाजाची संस्कृतीची जपणूक करत बंजारा समाजाच्या वेशभूषेत पारंपारिक नृत्य करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी १० वाजता भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर येथून संत सेवालाल महाराजांच्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या ध्वज बांधलेल्या मोटरसायकलची रॅली काढण्यात आली व शहरातून जुने बसस्थानक,मस्जिद चौकातून वसंतरावजी नाईक चौक येथे या रॅलीचा समारोप करण्यातआला, या मोटरसायकल रॅलीमध्ये चाकूर अहमदपूर विधानसभेचे माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे हे उपस्थित होते.

संत सेवालाल महाराजांच्या पांढर्या शुभ्र रंगाच्या सजवलेल्या ट्रॅक्टर मधून हालकीच्या वाद्यात बंजारा समाजातील महिला आपल्या नृत्य करत आणि डीजेच्या वाद्यामध्ये तरुण नवयुवकांनी बंजारा समाजातील गाण्यावर ताल धरुन सेवालाल महाराजांची मिरवणूक सुरु असताना यामध्ये भाजपा लातूर जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर व तरुण नेते रामभाऊ खंदाडे यांनीही मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता,ही मिरवणूक भाई किशनराव देशमुख महाविद्यालयापासून ते मुख्य रस्त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून शेवटी वसंतरावजी नाईक चौकात मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

यावेळी पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक दत्तात्र्य निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या निदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मस्के,पो.कॉ.मरपल्ले,पो.कॉ.कातळे,पो.कॉ.मुंडे,पो.कॉ.चव्हाण व होमगार्ड सह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

स्व.वसंतरावजी नाईक चौकात रुढी परंपरेनुसार संत सेवालाल महाराजांच्या नावाने व ज्वालामुखी जगदंबेच्या नावे भोग हावन करुन विती बोलून प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी संपूर्ण चाकूर तालुक्यातील बंजारा समाजातील महिला भगिनी तरुण वर्ग व नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.