आपला जिल्हा

बारावीच्या परीक्षार्थीनां प्रा.डॉ.सर्जेराव शिंदे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा.

पहिल्याच पेपरला उपसंचालक व बैठे पथक यांची हजेरी

मुख्य संपादक-सुनिल जाधव सेवा न्यूज चाकूर,लातुर मो-9766553995

भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना प्रा.डॉ.सर्जेराव शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा.. 

चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा सुरु झाल्या असून या केंद्रावर ४५४ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.या परीक्षा केंद्रावर प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख म्हणून प्रा.बाळासाहेब बचाटे हे काम बघत असून यावेळी बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्याना गुलाबाचे पुष्प देऊन प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे आणि प्रा.बाळासाहेब बचाटे यांनी स्वागत करत त्याना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

या परीक्षा केंद्रावर भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चाकूर,संत गोविंद बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लातूररोड,सरस्वती ज्युनियर कॉलेज वडवळ येथील मिळून ४५४ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.शांत वातावरणात व सीसीटीव्ही च्या निगराणीत परीक्षा सुरु आहेत.

या परीक्षा केंद्राला तहसीलदार रेणुकादास देवणीकर,शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे,माधव बाजगीरे,सराप यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.या केंद्रावर महसूल विभागासह शिक्षण विभागाचे बैठे पथक उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.