आपला जिल्हा

धनगर समाजाच्या वतीने १४ तारखेला रास्ता रोको आंदोलन

चाकूर तहसीलदार यांना दिले निवेदन.

मुख्य संपादक:-सुनिल जाधव सेवा लाईव्ह न्यूज लातुर मो:-9766553995

अनुसूचित जमातीच्या अमलबजावणी साठी सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे तहसीलदार यांना  दिले निवेदन.

चाकूर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने दि.११ आक्टोबर रोजी लातूर रोड (चाकूर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे एका निवेदनाद्वारे आज दि.४ आक्टोबर रोजी तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना धनगर समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एस.टी) आरक्षणाची अमलबजावणी करावी.या मागणीसाठी सकल धनगर समाज चाकूर तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना धनगर समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी) आरक्षण दिले आहे.आजपर्यंत सर्वच पक्षाच्या राज्य सरकारने धनगर समाजाला एस.टी.आरक्षणाची अमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ केली आहे.तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये धनगर समाजाच्या (एस.टी.)आरक्षणाची अमलबजावणी तेथील राज्य सरकारने केलेली आहे.

त्यामुळे चाकूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या एस.टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ११ आक्टोबर रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता लातूर रोड येथील लातूर नांदेड हायवे वर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चाकूर व चाकूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर माजी पंचायत समिती सभापती ॲड.माधवराव कोळगावे,माजी सरपंच गंगाधर केराळे,मा.जिल्हा प.सदस्य विवेकानंद लवटे,मा.सरपंच अशोकराव करडिले,मनसेचे चाकूर तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,नागेशवाडीचे सरपंच सुनिल केसाळे,सामाजिक कार्यकर्ते लहू कोरे,संतोष गडदे,राम भंगे,सुदर्शन येरमे,धोंडीराम म्हेत्रे,ज्ञानोबा हाके,बालाजी मलिशे,तुकाराम वागलगावे,ज्ञानोबा भदाडे,गोपाळ म्हेत्रे,शैलेश येणगे,चक्रधर कांबळे,नारायण काचे आदी धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

शेअर करा.

मुख्य संपादक

सेवा न्यूज लातुर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.